हरियाणा: गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळेल
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज 'हर घर हर गृहणी योजना' पोर्टल लाँच केले. याअंतर्गत राज्यातील अंत्योदय कुटुंबांना आता ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत हरियाणातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार दरवर्षी 1500 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
0 Comments