✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमुर तालुक्यातील भिसी येथे नविन उपक्रम राबवले झाडे लावा झाडे जगवा समाज कार्याची ओढ आणि निसर्ग संवर्धनाच्या जाणीवेतून प्रेरीत झालेल्या एका महावितरण अभियंत्याने स्वः खर्चातून तीनशे च्या वर झाडे लावली, त्या अभियांत्या चे नाव श्री. कृपाल महादेव लंजे असून तो विज वितरण केंद्र भिसी, महावितरण येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे. आपण दैनंदिन जीवनात बघतो की प्रत्येक जण स्वतःसाठी
जगण्यात व्यस्त आहेत, अशा परिस्थितीत कुणाला तरी निसर्गाची आणि एकंदरीत मानवी आयुष्यात झाडांची माहीती लक्ष्यात यावी व कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्या महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिळेल त्या ठिकाणी जसे भिसी बस स्थानक, उमरेड- चिमूर महामार्ग, ३३/११ के. व्ही. उपकेंद्र भिसी, तसेच भीसी मधील काही ठरावीक शाळांमध्ये वृक्षारोपण करून, समाजातील इतर लोकांना वृक्ष लागवड व संगोपन ही काळाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी अग्रगण्य भुमिका बजावली.
0 टिप्पण्या
Thanks for reading