चंद्रपूर शहरातील बिनबागेट संकुलात गोळीबार : हाजी सरवर शेख गंभीर जखमी
चंद्रपूर शहरातील बिनबा गेट संकुलातील घटना
दरारा 24 तास: चंद्रपूर: शहरात गोली बारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. आज दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोज सोमवारी दुपारी एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात घुग्घुस येथील हाजी सरवर शेख नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
शेख यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. काही जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण बिनबा संकुलासह चंद्रपूर हादरले आहे. या घटनेने जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत. गोळीबार ही आता चंद्रपूर जिल्हा वासियां साठीसामान्य बाब बनल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे..
- साभार - चंद्रपूर तक
0 Comments