✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर:- " विना सहकार नाही उद्धार " हे मूलमंत्र जोपासत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चिमुर विधानसभा क्षेत्रातील ३७ मच्छीमार सहकारी संस्थाना ५० हजार रूची आर्थिक मदत देण्याची घोषणा करीत चिमूर तालुक्यातील १४संस्था पैकी १० संस्थाना मदत सुपूर्द करण्यात आली. चिमूर येथील वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थे ला ५० हजार रू. धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष शंकर मोहीनकर व संचालक मंडळा कडे सुपूर्द केला.
ढिवर समाजाच्या व मच्छीमार संस्था च्या विकासा साठी आमदार बंटीभाऊ भांगडिया पाठीशी आहे. मच्छीमार यांचे साठी जॅकेट, जाळे खरेदी किंवा इतर कार्या साठी ही मदत आहे. समाजानी येणाऱ्या काळात आमदार बंटीभाऊ भांगडिया सोबत राहण्याचे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी केले.
मंचा वर युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, शंकर मोहीनकर, भुपेश पचारे,रमेश कंचर्लावार, विलास कोराम,विकी कोरेकर, करण चावरे, गुणवंत चटपकर उपस्थित होते. यावेळी संस्थे चे संचालक व समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments