विविध मागण्यांसाठी सरपंच संघटनेचे 16 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन
संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेले निवेदन।सर्व सरपंच उपस्थित
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
सरपंचांच्या अधिकाराच्या बाबतीत अनेक समस्या व मागण्या घेऊन संपर्क विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचना वजा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मागण्या अशा आहेत, न्यायालयाने रद्द केलेले 15 लाख रुपये पर्यंतचे काम ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावे, सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या मानधनात भरीव वाढ करणे, सरपंच उपसरपंच व सदस्य यांना कामाच्या ठिकाणी विमा कवच उपलब्ध करून देणे, आमदार खासदाराप्रमाणे ग्रामपंचायत स्थानिक विकास निधी उभा करून सरपंच यांना दहा लाख रुपये पर्यंतचे कामाचा अधिकार प्रदान करणे, ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या सर्व समितीचे अध्यक्ष पद सरपंच यांना बहाल करणे, त्यात प्रामुख्याने वन हक्क समितीचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रातून सरपंच, गावठाण लगत असलेली महसुली व वन हक्क आणि झुडपी जंगलाचे आरक्षित गट क्रमांक च्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वळती करून गावठाण क्षेत्राला जोडण्यात यावे, प्रतिनिधी साठी दोन जागा राखीव कराव्यात, रेती घाट असलेल्या ग्रामपंचायतींना घाट लिलाव करण्याचे अधिकार बहाल करण्यात यावे, गौण खनिज व मुद्रांक शुल्क नियमित ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात यावा, नागरी सुविधा, जन सुविधा व दलित वस्ती सुधार योजना ग्रामपंचायतीने सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार प्राधान्य देण्यात यावे, आपदाप्रसंगी ग्रामपंचायत यांना पोलीस संरक्षण मोफत व वेळेवर मिळावे, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत शिपाई कडेन सर ड्रायव्हर म्हणजेच मानधन भत्ता आणि पगार 100% सरकारी मान्यता प्राप्त व ग्रामपंचायत वर कोणताही भर दंड पडू नये., ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रात केल्या जाणाऱ्या विकास कामांना आमदार खासदार निधी इत्यादी विकास कामे ग्रामपंचायतचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य करावे व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र शासन स्तरावरून अदा करण्यात येऊ नये. इत्यादी मागण्या घेऊन गटविकास अधिकारी श्री यांना सर्व सरपंच यांनी निवेदन सादर करण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून काम बंद आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर, माधुरीताई नैताम, उपसरपंच जितू भाऊ चुधरी, शंकर वाकुडकर,सरपंच शेखर व्याहाडकर, सरपंच सचिन पोतराजे, सरपंच दर्शना जुमनाके, सरपंच पपिताताई तोडसाम भीमनी, सरपंच मडावी सातारा तुकुम, सरपंच पिपरे कसरगटा उपस्थित होते.
0 Comments