-चिमूर येथे क्रांती दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली
✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर : दीडशे वर्षाची इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात गवालिया टैंकमैदानावरून 'भारत छोडो' हा नारा दिला. या नाऱ्याने संपूर्ण देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पसरला. हाच नारा चिमुरातील किल्ला मैदानात पोहोचला आणि क्रांतिकारक पेटून उठले. या क्रांतीचे गवालिया टैंक व चिमुरातील किल्ला मैदान हे ऑगस्ट क्रांतीचे केंद्र ठरले होते. असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी मनोगत व्यक्त करतांना दि. ९ ऑगस्ट क्रांती दिली शहीदविरांना आदरांजली वाहताना छोटे खानी कार्यक्रमांत केले. दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून चिमूर येथे घडलेल्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांतून क्रांतीची बीजे पेरण्यात आली आणि किल्ला मैदानातून दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमुरात रणसंग्राम पेटला होता. या लढ्याच्या आठवणी दरवर्षी दि. ९ ऑगस्ट रोजी ताज्या होत असतात. याच आठवणीचे दरवर्षी स्मरण करुन आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक चिमूर व अभ्यकर मैदान येथे येथे दि. ९ ऑगस्ट क्रांती दिन निमित्त स्वातंत्र संग्राम क्रांतीवीर शहीदाना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली (श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शहीद बालाजी रायपूरकर व महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक ला पुष्पचक्र अर्पण
करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी वीर शहीद हुतात्मे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा, शहिद बालाजी रायपूरकर अमर रहे जयघोष देण्यात आले. यावेळी वारश
चिमूर येथे क्रांती दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली
भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, जेष्ठ नेते घनश्याम डुकरे माजी सभापती प्रकाश वाकडे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा युवा नेते समीर राचलवार महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे शहर अध्यक्ष दुर्गा सातपुते, चिमूर सोसायटी अध्यक्ष हेमराज दांडेकर, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी तालुका अध्यक्ष कलीम शेख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलाश धनोरे युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, अशोक कामडी, गिरीष भोपे, प्रकाश बोकारे, जयंत गौरकर, श्रेयस लाखे, विलासकोराम, अर्जुनथुटे, बब्बू खान, आशु झिरे, संजय खाटीक कुणाल कावरे, रमेश कंचर्लावार, गोलू मालोदे, राकेश कामडी, सागर भागवतकर, राजु बोडणे, नितीन बघेल, प्रवीण सातपुते, विकी कोरेकर, गणेश मेहरकुरे, अजय शिरभैये, आकाश दुर्गे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments