बेबांळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एक महिन्या पासुन बंद!
*तात्काळ सुरू करा-उपसरपंच जितु चुदरी यांची मागणी
विजय जाधव:मुल तालुक्यातील शुध्द पाणी पुरविणारी बेबांळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विज देयकाचा भरना न केल्याने सरद योजनेची वीज खंडित करण्यात आल्याने गेल्या एक महिन्यापासून योजनेचा पाणी पुरवठा बंद आहे. या मुळे पाण्यासाठी नागरिकाना इतरत्र भटकावे लागत आहे.
पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी घोसरी ग्रामपंचायत चे उपसरपंच जितुभाऊ चुदरी यांनी केली आहे.
ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पाणी पुरवठा अभावी योजनेत समाविष्ट गोवर्धन / नांदगाव / घोसरी / नवेगाव भुजला / कोरंबी / गडिसुरला/ दुगाळा/चेक दुगाळा इत्यादी गावे समाविष्ट आहेत. उपरोक्त गावातील पावसाळ्याच्या दिवसात दुषीत पाण्याचा वापर करावा लागत असुन आधीच पावसाळ्यात रोग राई व विविध आजाराने नागरिक बेजार आहेत. अशा वेळी शुद्ध पाणी पुरवठा योजना पुरवत सुरू करून योजनेचा लाभ क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा करने अत्यंत अनिवार्य आहे. या गंभीर बाबीची पाणी पुरवठा विभागाच्या अधीकार्यानी व कंत्राटदारानी दखल घेऊन त्वरीत पाणी पुरवठा योजना पुरवत सुरू करावी अशी मागणी व वजा विनंती घोसरी चे उपसरपंच जितुभाऊ चुदरी ग्रामपंचायत घोसरी यांनी केली आहे.
0 Comments