Ticker

6/recent/ticker-posts

*जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त अभिवादन*

*जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त अभिवादन*


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
          7887325430

चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. १ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष  जगदीश रामटेके,पत्रकार रामदास ठुसे  ,स्वप्नील मसराम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
याप्रसंगी योगेश मेश्राम  यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे   यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.  अशा शब्दात मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 
यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
 यावेळी सत्यफुलाबाई चव्हाण, शकुंतलाबई मेश्राम, गंगाधरजी गजभिये,विराज गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले व आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments