Ticker

6/recent/ticker-posts

चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ सातपुते यांचा भाजपात प्रवेश.आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर शहराचा कायापालट - प्रविणभाऊ सातपुते.

चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ सातपुते यांचा भाजपात प्रवेश.आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर शहराचा कायापालट - प्रविणभाऊ सातपुते.


✍️ शार्दुल पचारे तालुका प्रतिनिधी चिमूर 
            7887325430

  चिमूर:- २९ जुलै आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथील निवासस्थानी चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ सातपुते यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतला. देशातील समस्त जनतेच्या आशीर्वादाने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या कणखर नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला चिमूर शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ सातपुते यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. 

यावेळी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ सातपुते यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले की, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर शहराचा न भूतो असा विकास करून दाखविला. मी पूर्वीपासूनच विकासाला प्राधान्य व साथ दिलेली असून सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही असाच चिमूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सोबत ठामपणे उभा राहणारच. तसेच, आता थेट प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पक्षप्रवेशाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे सर, भाजपा ज्येष्ठ नेते रमेशजी कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा नेते अजहर शेख, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, चिमूर कृ. उ. बा. समिती संचालक दिनकरराव सिनगारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकर, भाजयुमो तालूका महामंत्री रोशन बन्सोड, भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन बघेल, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, भाजयुमो शहर महामंत्री निखिल भुते, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालूका महामंत्री पराग अंबादे, भाजपा युवा नेते नरेंद्र हजारे, भाजपा बूथ अध्यक्ष राकेश भोयर व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments