जि.प.उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत जुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिवस साजरा....
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी...
.देशाचा ७८ वा स्वतंत्र दिवस तालुक्यातील जुनगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.जिप शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळकरी विद्यार्थ्यांची गावात भव्य रॅली काढण्यात आली.ही रॅली गावातून गगनभेदी घोषणा देत गावातील मध्यभागी असलेल्या ग्रामपंचायत भवनाच्या प्रांगणात आली.ग्रामपंचायत सरपंच राहुल भाऊ पाल यांनी राष्ट्रध्वज फडकवला.त्यांना निलेश ठाकरे सर यांनी मानवंदना दिली.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या रेली ने शाळेकडे कुच केली.
शाळेतील राष्ट्रध्वज शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरीचंद्र पाल यांच्या हस्ते फडकवण्यात आला.त्यांनंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरूण तडफदार सरपंच राहुल भाऊ पाल हे होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच, पत्रकार जिवनदास गेडाम, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल मुरलीधर पाल, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल चुदरी, सामाजिक कार्यकर्ते व प्राॅपर्टी डिलर प्रकाश भाऊ भाकरे, पोलीस पाटील कान्होजी पाटील भाकरे, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच विश्वेश्वर भाकरे, ग्रामपंचायत सदस्य तेजपाल आनंदराव रंगारी, ग्रामपंचायत सदस्या सोनी चंद्रकांत चुदरी, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी किशोर देशमुख, ग्रामपंचायत सदस्या माधुरी प्रकाश झबाडे, देवराव आभारे,संजय भोयर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला गावातील नागरिक, तरूण, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments