चंद्रपूर: 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी इयत्ता दहावी व बारावी आणि पदवी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजता कर्मवीर कन्नमवार सभागृहात होणार आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात "अबे पोट्टे हो"या शब्दासाठी प्रसिद्ध असलेले वर्ध्याचे प्राध्यापक नितेश कराळे सर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत ठाकरे हे राहणार आहेत.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष सिंह रावत राहणार असून उद्घाटन डॉक्टर एन एस कोकोडे निवृत्त संचालक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे हस्ते होणार आहे.
माननीय एडवोकेट अनिल वैरागडे,अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मुल, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथीचे स्थानभूषविणार आहेत.
शैक्षणिक दृष्ट्या जीवनाला नवी दिशा आणि प्रेरित करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष सिंह रावत मित्र परिवार मुल यांच्यावतीने करण्यात आले आहे.
======================
जाहिरात
0 टिप्पण्या
Thanks for reading