संदिपभाऊ गिऱ्हे यांनी घेतली गंगापूर वासीयांची भेट
*-गंगापूर येथील नागरिक साथीच्या आजारांनी आहेत ग्रस्त*
*-जीवन ड्रापचे केले वाटप*
पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर गावात मागील आठ दिवसांपासून ताप,सर्दी, अतिसाराची साथ पसरली आहे.आतापर्यंत गावातील २० लोकांना साथ रोगाची लागण झाली आहे.या साथीत चार दिवसापुर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळ माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी गंगापूर वासीयांची भेट घेतली व चार दिवसापुर्वी दि.८ ऑगस्टला गंगापूर गावातील ४२ वर्षीय शोभा भिकाजी वाघाडे या महिलेचा तापाने मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
गंगापूर गावातील नागरिकांना गावात जलशुद्धीकरण संयंत्र नसल्याने नाईलाजाने वैनगंगा नदितील गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.गावातील नागरिकांनी शुध्द पाण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती.मात्र प्रशासनाने याकडे आजपर्यंत कानाडोळाच केला आहे.गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अख्खा गाव वैनगंगा नदितील गढुळ पाणी पितात.त्यामुळेच गंगापूर गावात मागील आठ दिवसांपासून ताप,सर्दी,अतिसार, हगवनची साथ पसरली आहे.या गावातील २० लोकांना साथीच्या रोगाची लागण झाली आहे.ताप,सर्दी,हगवण,उल्टी यामुळे गावात भयंकर वातावरण पसरले आहेत.गावातील अर्धे लोकं साथीच्या आजारांनी परेशान आहेत.चार दिवसापूर्वी साथीच्या आजारांने गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी गंगापूर येथे येऊन गंगापूर वासियांची भेट घेतली.व मृतक महिलेच्या मुलीची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, ग्रा.पं.सदस्य वैभव पिंपळशेंडे राहुल भोयर उपस्थिती होते
गंगापूर गावातील लोकं पर्याय नसल्याने वैनगंगा नदितील गढुळ पाणी पित असल्याने त्यांना अतिसाराची लागण झाली आहे.या समस्येबद्दल चेक ठाणेवासना येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांनी गावकऱ्यांच्या मदतीला धावून गेले.त्यांना यथोचित मदत केले.व गंगापूर गावातील भिषण वास्तविकता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना याबाबत माहिती दिली.माहिती मिळताच संदिप गिऱ्हे दि.१२ ऑगस्ट सोमवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास गंगापूर वासियांची भेट घेतली.गढुळ पाणी न पिण्याची विनंती केली.व गंगापूर वासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही सुद्धा दिली.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावात मेडिकल कॅम्प लावण्याच्या संबंधित विनंती करणार असल्याचेही त्यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला.यावेळी येथील प्रत्येक घरी जीवन ड्रापचे वाटपही करण्यात आले.
==========================
0 Comments