मुल: गेल्या एक महिन्यापासून मुल तालुक्यातील बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा थकीत विद्युत देयका मुळे खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सदर पाणी पुरवठा योजना ऐन पावसाळ्याचा दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या मनमानी कारभार मुळे गोवर्धन,नांदगाव, घोसरी, नवेगाव,कोरबी, बाबराळा, दुगाळा इत्यादी गावातील लोकांवर दुशित पाणी पिण्याची वेळ आली होती.
या बाबतच्या अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांकडुन व पोभुर्णा तालुक्यातील सक्रिय युवा भाजपा कार्यकर्ते तथा घोसरी चे उपसरपंच जितुभाऊ चुदरी यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या पाणी समस्या सोडविण्यासाठी व्यथा मांडल्या. या बाबीची उपसरपंच जितुभाऊ चुदरी यांनी तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन सदर योजना पुरवत सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या बाबीची दखल घेऊन दि. 8 / 8 / 2024 ला सरद योजनेचा पाणी पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांमधे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आणि सरद योजना सुरू करण्याबाबत जितुभाऊ चुदरी यांनी प्रयत्न केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
0 Comments