Ticker

6/recent/ticker-posts

रानडुकराची दुचाकी ला धडक पतीचा मृत्यू पत्नी गंभीर- दाबगाव - डोंगर हळदी गावाच्या मधात घडली घटना

रानडुकराची दुचाकी ला धडक पतीचा मृत्यू पत्नी गंभीर-


दाबगाव - डोंगर हळदी गावाच्या मधात घडली घटना

तालुका प्रतिनिधी पोंभुर्णा, : मुल तालुक्यातील उथळपेठ येथील शेतकरी मारोती तुळशीराम बोबाटे वय ४० वर्षे व पत्नी अंतकला मारोती बोबाटे वय ३५ वर्षे हे दोघेही दुचाकीने मानोरा येथे पर्हे काढण्यासाठी दाबगाव मार्गाने जात असताना दाबगाव व डोंगरहळदीच्या मधात रानडुकराने धडक दिली.

यात दुचाकीचा अपघात होऊन मारोती बोबाटे याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी अंतकला बोबाटे ही गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना दि. ७ ऑगस्ट बुधवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतातील पीक व पहे पाण्यात वाहून गेले. रोवणीसाठी पन्हे नसल्याने रोवणीसाठी मोठी पंचाईत झाली.
दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. शेतकरी बांधव पह्याची जमवा जमव करीत आहेत. मारोती बोबाटे यांचे अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यात पन्हे वाहून गेले होते. त्यामुळे २० किमी अंतरावर असलेल्या मानोरा येथून पन्हे आणण्यासाठी मारोती आपल्या पत्नीला घेऊन टुव्हीलरने मानोरा कडे जात असताना दाबगाव व डोंगरहळदीच्या मधात जंगल परिसरात रानडुक्कराने टुव्हीलरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात मारोती बोबाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी अंतकला मारोती बोबाटे गंभीर जखमी झाली. जखमी अंतकलाला तात्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तात्काळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती उमरी पोतदार पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करीत आहेत. मृतक मारोतीच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वडील असा आप्त परिवार आहे.
====≠=================
               जाहिरात

Post a Comment

0 Comments