मृतक कीरण नागापूरे
===================
चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
चंद्रपूर:शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना. कोणत्या ना कोणत्या कारणावरून शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील येरगाव येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव किरण हिरामण नागापुरे व 48 वर्ष राहणार येरगाव तालुका मुल जिल्हा चंद्रपूर असे असून त्यांनी आपल्या मुलीच्या विवाह साठी त्रस्त होऊन व पुरात शेतपीक सुद्धा वाहून गेल्याने मुलीचा विवाह कसा करावा ही चिंता त्यांना सताऊ लागली ,आणि त्यांनी या चिंतेत आपली जीवन यात्रा संपवली.
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या येरगाव येथील ही शोकांतिका आहे. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे धनी असलेले किरण नागापुरे यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.
शांत व संयमी स्वभावाचे धनी असलेले किरण नागापुरे यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.
स्वर्गीय किरण नागापुरे हे जूनगाव येथील नावाजलेले व्यक्तिमत्व पांडुरंग पाटील पाल यांचे ते जावई आहेत. जुनगाव येथे त्यांच्या मृत्यूची बातमी धडकताच संपूर्ण जूनगाव शोकमग्न झाल्याचे दिसले. याला कारणही तसेच आहे. आत्महत्या केलेले शेतकरी हे अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांचेवर सर्वांचाच जिव्हाळा होता. त्यामुळे जूनगाव सुद्धा शोक सागरात बुडाला होता.
संपूर्ण माहिती मिळाली नसली तरी त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे कळाले आहे. मुलगी सुद्धा विवाहयोग्य झाल्याने कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्याने मुलीचा विवाह कसा करावा या चिंतेत, विवंचनेत सतत राहून - राहून काल मात्र शेवटचा निरोप घेतला.
महाराष्ट्रात आपल्या मुला- मुलींचे विवाह किंवा आपल्या कुटुंबाचा गाढा चालवू न शकणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवलेली आहे. या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयास शासनाने आर्थिक मदत व योजनांचा फायदा देऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यावा अशी मागणी गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
0 Comments