*त्रस्त असलेल्या अंगवाडीतील चिमुकल्या विद्यार्थानी धान रोवले.*

*त्रस्त असलेल्या अंगवाडीतील चिमुकल्या विद्यार्थानी धान रोवले.*




*✍️शुभम गजभिये प्रतिनिधी पळसगांव*

    चिमुर:- चिमुर तालुक्यातील नेरी या गावात अंगणवाडी क्रं 1 आणि 11 अश्या या दोन्ही अंगणवाडीला येणाऱ्या मुख्य मार्ग चिखलमय झाल्यामुळे  त्यानंतर नेरी ग्रामपंचायत काही दिवस अॅक्षन मोडवर आली होती मात्र त्या ठिकाणी एकही खोके मीळत नसल्याने पुन्हा मुकाट्याने बसलेली नेरी ग्रामपंचायतला जाग येण्यासाठी अंगणवाडीतील विद्यार्थी व पालक यानी काल दोन्ही मुख्य मार्गावर धान रोवनी करत नेरी ग्रामपंचायत चा निषेध नोंदवला.
आतातरी नेरी ग्रामपंचायत ला जाग येईल का ? याकडे नेरीवासीय जनतेच बारीक लक्ष असुन पचायंत समिती महिला व बालकल्याण विभाग चिमूर सुद्धा झोपेतच आहे का असा प्रश्न उद्भवतो ? 
 चिमुर तालुक्यातील नेरी गाव हे 15 ते 17 हजार लोकसंख्येच गाव असुन दोन्ही अंगणवाडीत जायला चारही बाजुने रस्ते चीखलमय झाले आहेत.एवढच नव्हे तर मुख्य रस्त्यापासून तर सर्व रस्ते खड्डे पडत चिखलमय झाले आहेत. नेरीच्या बाहेरुन चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे पण रस्ता कंप्लेंट होईन रहदारी चालु व्हायच्या अगोदरच तो रस्ता ऊखळला इतका मोठा भ्रष्टाचार चालु असुन आमच्या गावची लायकी नसताना. नेरी ग्रामपंचायत ची पहिली अधीसुचना जाहीर केली.  प्रथम नेरी या गावचा मुख्य मार्ग कुठलाही भ्रष्टाचार न करता मजबुतीने तयार करा आणी नेरी बायपास च माती टाकुन सिमेंट चे पैसे घेणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदारावर कारवाई करा. ही सामान्य गावकऱ्यांची मागनी आहे. तसेच या दोन्ही अंगणवाडीला येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करावे अन्यथा विद्यार्थी व पालक नेरी ग्रामपंचायत वर जोरदार आंदोलन करनार असा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू