Advertisement

पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी l उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना

पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी l

उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
    7887325430


चिमूर : - आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी कवडु मन्साराम सावसागडे वय वर्षे ५५ वर्षे धंदा शेती राहणार किटाळी असे जखमी चे नाव असून ठेक्याने शेती करीत होता. जिवती चा दिवस असल्याने दुपारच्या सुमारास १२ वाजून १५ मिनिटांनी गट क्रमांक ११५ विनय शेकर नन्नावरे यांच्या शेतात काम करीत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून  शेतकऱ्यास जखमी केले. व बालाजी गणपत नन्नावरे वय वर्षे ५२ व्यवसाय शेती राहणार गरडापार हा व्यक्ती घटनेच्या वेळी खसरा क्रमांक. १३५ येथे कामावर असतांना त्यांच्यावरही वाघाने हल्ला करून वेळ दुपारी १२:४५ च्या सुमारास हल्ला चढवून जखमी केले.
आणि त्यानंतर बाबाराव दडमल वय वर्षे ४५ राहणार ऊरकुडपार हा शेतकरी शेतात दुपारच्या सुमारास वेळ २:०० वाजता काम करण्याकरिता गेला असता त्यावरही अचानक वाघाने हल्ला चढवून जखमी केले.
अशाप्रकारे वारंवार पट्टेदार वाघाने हल्ला चढवून ३ शेतकऱ्यांना जखमी केले असून तिनही जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तात्काळ नागपूर येथे रेफर करण्यात आले.यावेळी रुग्णालयात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रामात जमली होती. पट्टेदार वाघ अजूनही घटनास्थळी स्थानबद्ध असून उरकुडपार , किटाडी,गरडापार वासीय जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
======================
जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या