वंदे भारत ट्रेनच्या पायलटचे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर : नागपुर ते सिकंदराबाद या “वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे वर्चुअल उद्घाटन करण्यात आले. या निमित्त चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रेल्वेच्या यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफीन देत सन्मानित केले. यावेळी मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, रमणिक चव्हाण, विवेक खोके, अभिषेख गुप्ता, किरण नागपूरे, एस.एस मानकर, प्रसाद, रमेश राजूरकर, नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार, डाँ. गोपाल मुंदडा, यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Thanks for reading