शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली* *@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न*

*शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली*


*@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न*

पोंभूर्णा: राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद योद्धा वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजीत केला जाते. पोंभुर्णा आदिवासी चौक येथे सोमवार ला 167 वा शहीद दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी विर बाबुराव शेडमाके यांच्यावर चंद्रपूर गिरणार चौकाला लागून असलेल्या तुरंग परिसरातील पिंपळाच्या झाडाला विर बाबुराव शोेडमाके यांना इंग्रजांनी २१ ऑक्टोबर १९५८ रोजी फासावर लटकविले होते शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या कार्यावर प्रकाश नगरसेवक आशिष कावटवार यांनी टाकला.


 तर क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर व त्यांचा क्रांतिकारी इतिहासावर व घोट, गोंडपिपरी पोंभुर्णा, मुल तालुक्यात वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेला पराक्रमावर सखोल मार्गदर्शन आदिवासी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेडमाके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
आदिवासी समाजाच्या आयोजित 167 व्या शहीद दिन कार्यक्रमाला नगरसेवक आशिष काववार, महेंद्र शेडमाके,कांताबाई मेश्राम,शेषराव कुळसंगे,पुरुषोत्तम सिडाम, सुकदेव सिडाम, चरणदास मेश्राम,इंवंदरजी गेडाम,घनश्याम सिडाम,भोलानाथ कोवे,प्रेमदास पेंदोर,व आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालक लक्ष्मीकांत मेश्राम,प्रास्ताविक भावेश आत्राम तर आभार किशोर कुडसंगे यांनी मानले.यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू