विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप-प्रेरणा हाऊस यांचा उपक्रम
दरारा २४ तास
चंद्ररपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती दि. 2 ऑक्टोंबर 2024 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर येथे साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त "प्रतिष्ठान प्रेरणा फार्म हाऊस"चे मालक डॉक्टर नरेंद्रजी कोलते यांनी मुलांच्या शैक्षणिक वापरासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.श्री रविंद्रजी लहांमगे विस्तार अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांच्या हस्ते नोटबुक आणि कंपास पेटी चे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान. बाबा सूर्तीकर, उपाध्यक्ष मान. रेखा शेलवटे आणि सर्व सदस्य गण, ग्रामपंचायतचे उपसरपंच मान. संजयजी गनफाडे , शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुलोचना माहूरकर मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या,गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading