चंद्रपूर जिल्हात सर्वात जास्त उमेदवार नशीब अजमावतायत...!
चंद्रपूर :-दरारा 24 तास न्युज नेटवर्क
डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांना ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये झुंजार बॅटिंग सुरू केली आहे. त्यांना तसा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे नलेश्वर येथील बल्लारपूर ७२ विधानसभ`च्या अपक्ष बहुजनांच्या आणि
जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या सभेला सुजाण नागरिकांनीप्रचंड गर्दी केली गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे गेल्या ३० वर्षापासून
मतदारसंघांमधील जनता हजारो
समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी अभिलाषा ताई गावतुरे सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श शैक्षणिक मार्गदर्शन असेल करियर गायडन्स असेल गावोगावी वाचनालयाचा आणि अभ्यासिकेचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांच्या बसेसच्या प्रॉब्लेम असेल अभिलाषा ताई यांच्या पाठीशी कंपनी उभ्या होत राहिले आहेत जे निवडून आलेले जनप्रतीनिधीही करत नाही ते प्रश्न विलास होता हे उचलतात नवेगाव मोरे येथे दोनशे विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक होते अभिलाषा ताईंनी आंदोलन करून तेथील शाळेला तीन शिक्षक मिळवून दिले.
प्रश्नावर एक मोठा आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांना घेऊन एक मोठे आंदोलन उभारले वाघांच्या हल्लूयामध्ये ठार होतले असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलून धरला मेंढपाळांच्या चराईच्या प्रश्नावर अगदी वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत धाव घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आपल्या डॉक्टरांच्या मोठ्या चमुच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलातील गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा प्रदान केल्या
पाणीपुरवठा विभागाच्या मजुरांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद च्या प्रशासनासमोर लावून धरला आणि त्यांना न्याय मिळवून दिला.
शाळेच्या खाजगीकरणाचा प्रश्न असो किंवा नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा सर्व आंदोलनामध्ये सर्व समाजाचे नेतृत्व करत अभिलाषा ताईंनी अनेक आंदोलने उभी केली २६ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी जनगणनेसाठी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्चाचे नेतृत्व सुद्धा अभिलाषा ताई आणि डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.
विधानसभेतील आदिवासी समाजातील लोकांवर प्रशासनाद्वारे आणि वनविभागाद्वारे जेव्हा अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा सर्वप्रथम अभिलाषाताई गावतुरे यां त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्या या सर्व कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील ओबीसी आंबेडकरी आदिवासी अल्पसंख्यांक आणि सर्व समाजामध्ये अभिलाषा ताईंचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे.
आणि म्हणून गावोगावी गल्लोगल्ली त्यांच्या प्रचाराची झुंजार बॅटिंग पाहून राजकीय पक्षांच्या उमेदवारांना घाम फुटला आहे. या विधान बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तिसऱ्यांदा या क्षेत्रात आपले नशीब अजमावत आहेत. काँग्रेसचे संतोष रावत हे सुद्धा या क्षेत्रात पहिल्यांदाच आपले नशीब अजमावत आहेत. परंतु राजकीय पक्षांच्या बंडखोरीतून तिकीट न मिळालेल्या अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या क्षेत्रात वीस उमेदवार रणांगणाच्या मैदानात नसीब अजमावत आहेत. परंतु जाणकाराच्या मते या क्षेत्रात तिहेरी लढतीत अपक्ष असलेले उमेदवार डॉक्टर गावतुरे यांनी झुंजार बॅटिंग सुरू केली आहे. कितपत यांची बॅटिंग नॉट आउट राहते. आणि अनुभव असलेल्या प्लेअरला कोण आऊट करेल हे मात्र वीस तारखेच्या नंतरच कळणार आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading