अहेरी अल्लापल्ली पोलिसांची दारू विक्रेत्यांवर कारवाई-एकास अटक
मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी
अहेरी: विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या दारू विक्रीचा गोरख धंदा केला जातो. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.
अल्लापल्ली येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या चार आरोपींवर कारवाई करण्यात आली. सुरेश गोटमवार यास अटक करून पीसीआर घेण्यात आला आहे. या कारवाईत किंगफिशर बियर-५० नग,
रॉयल स्टॅग व्हिस्की-१० नग,
देशी दारू -३० नग,
मोटर सायकल-०२
असा एकुन 61400 रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक इज्जापवार सर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात ए पी आय देवेंद्र पटले, पीएसआय करिष्मा मोरे, हेडकांस्टेबल विठ्ठल रामटेके, शंकर बेल्हाडे यांनी केली.
राम नवमी निमित्त पोलिसांचा रूटमार्च
राम नवमी निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला. ड्रिल प्रॅक्टिसही घेण्यात आली.
0 टिप्पण्या
Thanks for reading