Advertisement

माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनोद अहीरकर यांचे विनम्र अभिवादन

माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनोद अहीरकर यांचे विनम्र अभिवादन

विजय जाधव:प्रतिनिधी
नांदगाव, दि. ३० मे: चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार व जनतेच्या मनातील नेता म्हणून ओळखले जाणारे दिवंगत नेते माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कार्य आठवले जात आहे. यानिमित्ताने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (ओबीसी सेल विभाग) विनोद भाऊ अहीरकर यांनी त्यांना विनम्र अभिवादन करीत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली.

"बाळूभाऊ हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक कार्यकर्त्यांच्या मनातील नेता होते. त्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या अकाली जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याची फार मोठी हानी झाली आहे," असे भावनिक उद्गार अहीरकर यांनी व्यक्त केले.

बाळूभाऊ धानोरकर यांनी आमदार ते खासदार अशी यशस्वी राजकीय वाटचाल केली होती. ते विविध सामाजिक प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवत असत. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक युवक प्रेरित झाले. त्यांनी लोकसभेत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर प्रभावीपणे भाष्य केले होते.

विनोद भाऊ अहीरकर यांनी या निमित्ताने जनतेला आवाहन केले की, "बाळूभाऊंच्या विचारांनुसार आणि त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून आपण सामाजिक कार्यात सहभाग घेणे हेच त्यांना खरे श्रद्धांजली ठरेल."

बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्ह्यात विविध स्तरांवर श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वच राजकीय, सामाजिक व युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या