Advertisement

नांदगाव ग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत: राजकीय समिकरणे बदलणार की पुनरावृत्ती होणार?

 नांदगाव ग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत: राजकीय समिकरणे बदलणार की पुनरावृत्ती होणार?

चंद्रपूर | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या गावातील सत्तांतर नेहमीच चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय राहिला आहे. यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय गट-संघटना, माजी पदाधिकारी आणि इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सत्तेच्या केंद्रस्थानी ‘नांदगाव’

नांदगाव ही ग्रामपंचायत केवळ प्रशासनाच्या दृष्टीने नाही तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाची मानली जाते. येथील सत्ता कोणाच्या हातात जाते, याचा प्रभाव संपूर्ण तालुक्याच्या राजकीय समीकरणांवर दिसून येतो. त्यामुळे येणारी निवडणूक केवळ ग्रामपंचायतीपुरती मर्यादित न राहता, ती अनेक राजकीय गटांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

राजकीय पटावरील प्रमुख चेहरे

माजी सरपंच मंगेश भाऊ मगनुरवार – भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांचा गावात चांगला जनसंपर्क आणि प्रभाव मानला जातो. त्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि विकासकामे अजूनही गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहेत. त्यांच्या समर्थकांचा दावा आहे की, आगामी निवडणुकीत पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामपंचायतचा ताबा येईल.

माजी सरपंच प्रशांत बांबोडे, विद्यमान प्रभारी सरपंच सागर देऊळकर, माजी उपसरपंच विजय जाधव आणि तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप भोगावार – हे सर्वही अनुभवी, सशक्त आणि सामाजिक कार्यात सक्रीय असलेले लोक आहेत. त्यांच्यामध्येही सरपंच पदासाठी इच्छुक असलेले अनेक आहेत.

काँग्रेस विरुद्ध भाजप: प्रतिष्ठेची लढत

नांदगाव हे काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांचे जन्मगाव असल्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक अधिकच महत्त्वाची आहे. त्यांचं गटबळ, कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील कामगिरी लक्षात घेता काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे दुसरे गटाचे नेते व पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर यांनी सुद्धा या गावची सरपंच पदाची धुरा सांभाळली आहे. ते सुद्धा आपली ब

पेनल सक्षम पने लढवणार आहेत.

त्याचवेळी भाजपचे माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचं पुनरागमन होईल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भाजपही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत मैदानात उतरली आहे.

विकास हाच अजेंडा का फक्त राजकारण?

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विकासकामे, गावाचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, महिलांसाठी उपक्रम, युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर चर्चा होईल की राजकीय आरोप-प्रत्यारोप हाच केंद्रबिंदू ठरेल? हे अजून स्पष्ट नाही. मात्र सध्या तरी राजकीय पक्ष, गट आणि व्यक्तींमध्ये सुरू असलेली हालचाल पाहता, लढत अत्यंत चुरशीची आणि नाट्यमय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटी विजय कुणाचा?

नांदगाव ग्रामपंचायत सत्तेचा तक्ता कोण बदलतो आणि कोण सत्तेवर विराजमान होतो, हे आगामी आठवड्यांमध्ये स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट नक्की – नांदगावमध्ये यंदाची निवडणूक ही तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरणार आहे.

---

– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

(आपण आमच्या वेबसाईटवर अधिक अपडेट्ससाठी भेट द्या.)

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या