कोंबड बाजारावर पोलिसांची धाड: चेक फुटाणा येथून 10 दुचाकी जप्त
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी - विजय जाधव, नांदगाव
पोंभुर्णा तालुक्यातील चेक फुटाणा येथे भरवण्यात येणाऱ्या अवैध कोंबड बाजारावर मुल पोलिसांनी कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत 10 दुचाकींसह विविध साहित्य जप्त करण्यात आले असून, अनेक संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चेक फुटाणा परिसरात दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर अवैध कोंबड बाजार भरवला जात होता. यामुळे परिसरात गैरप्रकार वाढण्याची शक्यता होती. याची गंभीर दखल घेत मुल पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत कोंबड बाजाराच्या ठिकाणी धाड टाकली.
या धाडीत बेकायदेशीररित्या बाजारात सहभागी असलेल्या अनेक संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी 10 टू-व्हीलर वाहनांसह विविध साहित्य जप्त केलं असून यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबाळ पोलीस चौकीचे मेजर प्रशांत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.
या अवैध बाजारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. पोलिसांच्या वेळीच झालेल्या कारवाईमुळे आता नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
© दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading