मुल प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
गडचिरोली शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेशजी रत्नवार यांच्या काकू, स्वर्गीय छायाताई रत्नवार यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त रत्नवार परिवाराला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व सांत्वन देण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी कीरसान यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
या भेटीवेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नवार, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे तसेच रत्नवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
खासदार डॉ. कीरसान यांनी रत्नवार परिवारातील सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले व या दुःखद प्रसंगी कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या संवेदनशील भेटीमुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading