गोटनपार (चिचगड), ता. देवरी, जि. गोंदिया येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबुरावजी हिडको यांचा सुपुत्र रोहित यांचा आशिर्वाद समारंभ सोहळा उत्साहात पार पडला. या खास प्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून नवविवाहित वधू-वरास मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या समारंभावेळी गोंड महासभाचे अध्यक्ष नरेंद्रजी नैताम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजयजी शिवणकर, काँग्रेस नेते चैनसिंहजी मडावी, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मोतीलालजी पिहदे, अनुसूचित जाती संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तसेच जगतजी सलामे, दिनेशजी कोरेटी, राजकुमारजी पुराम, पं. स. सदस्य रंजीतजी कासम, अशोकजी नरेटी, लखनजी सोनभोईर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यास उज्ज्वल वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि हिडको कुटुंबीयांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि आनंददायक वातावरणात संपन्न झाले.
0 टिप्पण्या
Thanks for reading