🛑 मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेसची धडक: ५ जणांचा मृत्यू, १० जखमी
📍 मुंबई – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा हादरा ठरलेली ही दुर्घटना! दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना धडकल्या. या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३६ वाजता कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल आणि दुसऱ्या ट्रॅकवरून धावणारी पुष्पक एक्सप्रेस यांच्यात दिवा-मुंब्रा दरम्यान घासाघाशी झाली. या धडकेनंतर लोकलच्या दारात उभे असलेले ८ ते १० प्रवासी धावत्या गाडीतून खाली पडले.
🏥 गंभीर जखमींवर उपचार सुरू
जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातानंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
🚨 रेल्वे प्रशासनाची तातडीने कारवाई
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
---
🔴
0 टिप्पण्या
Thanks for reading