पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शताब्दी जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा नांदगाव कुर्मार समाजात सत्कार सोहळा संपन्न
नांदगाव, दरारा 24 तास न्यूज नेटवर्क –
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंती महोत्सवानिमित्त नांदगाव येथील कुर्मार समाजात एक भव्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कुर्मार समाजाने केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदगावचे माजी सरपंच सुरेश पाटील अहिरकर उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी सरपंच सागर देवूरकर, माजी सरपंच प्रशांत भाऊ बांबोडे, माजी सरपंच कुमारी हिमानीताई वाकूरकर, माजी सरपंच मंगेश मगनुरवार, ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई धुरकीवार, समाजाचे अध्यक्ष दशरथजी धुरकीवार, माजी सदस्य राजीव अलीवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दशरथजी दुरकीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. त्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर समाजातील दहावी, बारावी आणि पाचवी इयत्तेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सुरेश पाटील अहिरकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशांत बांबोडे यांनी अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वीच नव्हे तर समाजाभिमुख होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
प्रभारी सरपंच सागर देवूरकर यांनी पुढील वर्षी गावात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्याची ग्वाही दिली, तर हिमानी वाकूरकर यांनी विद्यार्थ्यांना समायोजित मार्गदर्शन दिले.
जनसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज अहिरकर यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य शिक्षण व नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगावचे माजी उपसरपंच विजय जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल अनलवार यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे मन:पूर्वक केले.
या कार्यक्रमास गावातील नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात एकात्मता, एकोपा आणि प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरला.
0 टिप्पण्या
Thanks for reading