🔴 नांदगावसारख्या संवेदनशील गावाला स्थायी तलाठी कधी मिळणार?
📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी – विजय जाधव, नांदगाव
नांदगाव (ता. मुल) – राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महसूल विभागासाठी महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नांदगाव साज्यासाठी आजही स्थायी तलाठ्याची प्रतीक्षा सुरूच आहे. या साज्यात जुनगाव, देवाळा, घोसरी, पिपरी देशपांडे, दिघोरी, गोवर्धन यांसारख्या अनेक गावांचा समावेश असून नांदगाव हे गाव संपूर्ण परिसरासाठी मध्यवर्ती केंद्र मानले जाते.
📌 सध्या कोणाच्या ताब्यात आहे नांदगाव साज्या?
सध्या नांदगाव साज्याचा प्रभार बेंबाळसाचे तलाठी श्री. नगराळे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी म्हणून देण्यात आला आहे. मात्र, त्यांना दोन्ही ठिकाणी वेळ देणे शक्य न झाल्याने, नांदगावच्या कार्यालयात नियमित उपस्थितीचा अभाव दिसून येतो.
😠 "उद्या येतो", "डी मार्टला पाठवा" – नागरिक संतप्त
नागरिकांनी सांगितले की, संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून "उद्या येतो" किंवा "डी मार्टला पाठवा" अशी टाळाटाळ केली जाते. परिणामी शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेषतः पिंपरी देशपांडे, जुनगाव, देवाळा येथील नागरिकांना ८-१० किलोमीटरचा प्रवास करूनही कामे रखडलेलीच राहतात.
🏢 कार्यालय उभे, पण अधिकारीच गायब!
शासनाने नांदगावमध्ये तलाठी कार्यालय स्थापन करून एक सकारात्मक पाऊल उचलले असले तरी, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा उद्देश फोल ठरत आहे. तलाठी नसल्याने शेतीविषयक दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा अशा अनेक कामांसाठी नागरिकांना नाहक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
📣 माजी सरपंचांची जोरदार मागणी
नांदगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांतभाऊ बांबोडे यांनी तहसीलदार महोदयां यांच्याकडे स्पष्ट मागणी केली आहे –
“नांदगाव साज्यासाठी तात्काळ स्थायी तलाठी नेमावा किंवा सध्याच्या तलाठ्यांना आठवड्यातून दोन दिवस नियमित उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत.”
⚠️ महसूल विभागाचे लक्ष वेधणारी बाब!
शासन आणि महसूल विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न वाढतच जातील आणि तलाठी कार्यालयाचा उद्देशच हरवेल.
📌 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क या माध्यमाच्या वतीने महसूल विभाग व संबंधित प्रशासनाकडे नांदगाव साज्यासाठी त्वरित स्थायी तलाठ्याची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
✍️ लेखक: विजय जाधव
📅 प्रसारण दिनांक: ८ जून २०२५
📍 स्थान: नांदगाव, ता. मुल, जि. चंद्रपूर
0 टिप्पण्या
Thanks for reading