आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात सेवा उपक्रम
पोंभुर्णा : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात युवासेनेतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात रुग्णांना फळज्यूसचे वाटप करण्यात आले तसेच व्हिलचेअर, वॉकर इत्यादी वैद्यकीय उपयोगी साहित्य भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.
या उपक्रमात युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्यासह अक्षय झाडे, गोकुळ तोडासे, साहिल नैताम, कृषभ बुरांडे, मुकेश ठाकरे, प्रवीण सातपुते, सुरज कावळे, विकास गुरूणुले, राहुल शेडमाके, राकेश मोगरकार व इतर शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमातून आदित्य ठाकरे यांच्या कार्याची प्रेरणा घेत रुग्णसेवेचा उपक्रम राबवण्यात आल्याचे युवासेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या
Thanks for reading