🔷 मा. विलासजी मोगरकर यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड – देवाडा खुर्द गावात आनंदाची लाट 🔷
देवाडा खुर्द, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर –
देवाडा खुर्द गावाचे सरपंच मा. विलासजी मोगरकर यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्याची अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण गावामध्ये आणि तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा. मोगरकर साहेब हे देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असून ग्रामविकास व सहकार चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांतून आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वात गावात विविध विकासकामे गतिमान झाली असून, ग्रामीण जनतेच्या विश्वासाला ते कायम उतरले आहेत.
बँकेच्या संचालकपदी त्यांची अविरोध निवड होणे, हे त्यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीचे आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे मा. विलासजी मोगरकर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याला नवी दिशा लाभो आणि शेतकरी, महिला व ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावी योजना राबविल्या जावोत, हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🌹 अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🌹
0 टिप्पण्या
Thanks for reading