💥ब्रेकिंग न्यूज | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
माजी राज्यमंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या सौ. नंदाताई अल्लुरवार यांचा भाजपा प्रवेश!
चंद्रपूर | प्रतिनिधी
राजकारणाच्या नव्या वळणावर एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. माजी राज्यमंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या, महिला नेत्या तसेच बँकेच्या माजी संचालक सौ. नंदाताई अल्लुरवार यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिक प्रवेश केला आहे.
हा प्रवेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. नंदाताई अल्लुरवार या जिल्ह्यात एक सक्रिय, अभ्यासू आणि प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना नंदाताईंनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात खऱ्या अर्थाने विकास होत आहे. त्यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाला अनुसरून मी भाजपा प्रवेश घेत आहे. समाजकारण हेच माझे ध्येय असून, जनतेसाठी कार्य करत राहणार आहे."
भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत नंदाताईंच्या अनुभवाचा उपयोग पक्षाच्या बळकटीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजकीय जाणकारांचे मत :
नंदाताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, तसेच स्थानिक राजकारणात भाजपची ताकद अधिक वाढेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
📌 आणखी अपडेटसाठी भेट द्या:
🌐 www.darara24taas.com
📲 दरारा 24 तास – नेहमी पुढे, नेहमी सत्यासोबत!
0 टिप्पण्या
Thanks for reading