Advertisement

तुकूम प्रभागातील रस्त्याचा दर्जा निकृष्ट; आम आदमी पार्टीची तात्काळ कारवाईची मागणी





तुकूम प्रभागातील रस्त्याचा दर्जा निकृष्ट; आम आदमी पार्टीची तात्काळ कारवाईची मागणी

🗓️ चंद्रपूर | प्रतिनिधी – दरारा 24 तास
चंद्रपूर शहरातील तुकूम प्रभाग क्र. 1 मधील सिमेंट काँक्रीट रस्ता दर्जाहीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महाडोळे यांच्या दुकानापासून श्रद्धा नगर बोर्डपर्यंत आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) बांधण्यात आलेल्या या रस्त्याच्या गुणवत्तेवर आम आदमी पार्टीने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

🌐 फेसबुक लाईव्हद्वारे उघड झाला प्रकार
आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष योगेश देवराव गोखरे यांनी स्वतःच्या पथकासोबत सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी करण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीत M30 दर्जाच्या जागी फक्त M15 दर्जाचा काँक्रीट वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर व शासकीय निधीच्या वापरावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

🔍 PWD अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
या संदर्भात PWD कार्यकारी अभियंत्याकडे अधिकृत निवेदन देण्यात आले असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, PWD टेस्टिंग टीम, संबंधित ठेकेदार आणि आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रस्त्याची पुन्हा तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.

🗣️ "गरज पडल्यास तीव्र आंदोलन!"
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये गुणवत्ता अत्यावश्यक आहे. यावर तडजोड केली जाणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असे अध्यक्ष गोखरे यांनी ठामपणे सांगितले.

👥 प्रमुख उपस्थिती:

  • मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, आ.आ.प.
  • योगेश गोखरे – अध्यक्ष, चंद्रपूर महानगर
  • राजू कुडे – युवा जिल्हाध्यक्ष
  • संतोष बोपचे – महानगर संघटन मंत्री
  • विशाल भाऊ, जितेंद्र भाटिया
  • तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते

📝 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
– बातमी ठामपणाची, आवाज जनतेचा!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या