दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, चंद्रपूर
महाराष्ट्रातील गाडी चालक व मालक गौरव गो. शामकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींना थेट पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सरकारच्या यंत्रणेत अजूनही रस्त्यावर ट्राफिक पोलीस व आरटीओ विभागाकडून सर्रास वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “ऑनलाईन प्रणालीमुळे कर, विमा, परवाने पारदर्शक पद्धतीने होतात, हे खरे आहे. पण प्रत्यक्ष रस्त्यावर अजूनही ड्रायव्हर आणि गाडीमालकांना पोलीसांकडून होणारा छळ, दहशत, वसुली, धमक्या याचा सामना करावा लागत आहे.”
गौरव शामकुळे म्हणतात, "सर्व कागदपत्रे असूनही ट्राफिक पोलीस काही ना काही कारण काढून १०० ते १०,००० रुपयांपर्यंतची मागणी करतात. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवतात. आम्ही कर्नाटक, गुजरात, राजस्थान, केरळमध्ये फिरतो, तिथे पोलीस मार्गदर्शन करतात; त्रास देत नाहीत. मग महाराष्ट्रातच हे चित्र का?"
ते पुढे म्हणतात की, "ट्राफिक पोलीस, आरटीओ व सिटी पोलीस हे चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाला लाखोंची वसुली करत असतील, पण त्यातून स्वतःचा हिस्सा काढत असल्याचं सर्रास पाहायला मिळतं. सेटलमेंटच्या नावाखाली सरळसरळ खंडणी केली जाते."
या समस्येमुळे गाडीमालक आर्थिक अडचणीत येत असून, कर्जाचे हप्ते, गाडीचा मेंटेनन्स, चालकाचा पगार, कर, विमा, आणि वरून ही जबरदस्ती – यातून मार्ग कसा काढायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेवटी त्यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित आमदार खासदार यांच्याकडे विनंती केली आहे की, "सरकार पारदर्शक आहे तर अधिकारी आणि पोलीस यंत्रणाही पारदर्शक व्हायला हवी. अन्यथा सामान्य जनतेचा शासन व कायद्यावरचा विश्वास उडेल."
प्रमुख मुद्दे:
- गाडी मालकांचा ट्राफिक पोलीस व RTOकडून त्रासाचा आरोप
- परवाना, विमा, परमिट असतानाही आर्थिक वसुली
- इतर राज्यांत त्रास नाही, महाराष्ट्रातच दहशत
- 'सेटलमेंट'च्या नावाखाली लाच घेतली जाते
- शासनाकडे विनंती – यंत्रणा पारदर्शक करावी
गाडी चालक, ट्राफिक पोलीस त्रास, RTO वसुली, महाराष्ट्र रस्ते समस्या, दरारा 24 तास न्यूज, गौरव शामकुळे, देवेंद्र फडणवीस तक्रार, ट्रक मालक व्यथा, पोलीस भ्रष्टाचार महाराष्ट्र, RTO तक्रार
महाराष्ट्रातील ट्रक चालक गौरव शामकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ट्राफिक पोलीस व RTO यंत्रणेकडून होणाऱ्या त्रासाविरोधात आवाज उठवला आहे. दरारा 24 तास न्यूज विशेष बातमी.
0 टिप्पण्या
Thanks for reading