Advertisement

गडचिरोली : खमनचेरू गावात नाल्यांची दुरवस्था; शिवसेना भारतीय मजदूर संघाची तातडीच्या कारवाईची मागणी

मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी 



मनोज गेडाम | तालुका प्रतिनिधी, अहेरी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील खमनचेरू गावात नाल्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वार्ड क्रमांक 1, 2 आणि 3 या भागांतील नाल्यांची अनेक वर्षांपासून सफाई न झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना भारतीय मजदूर संघाचे विभाग अध्यक्ष प्रकाश रामा गड्डलवार यांनी ग्रामपंचायत खमनचेरूच्या माजी सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाल्यांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी घरात शिरण्याच्या घटना सुरू झाल्याने डेंग्यू, हिवताप, कावीळ, डायरिया यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.

प्रकाश गड्डलवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने नाल्यांची साफसफाई झाली नाही, तर ही तक्रार थेट अप्पर जिल्हाधिकारी, अहेरी यांच्याकडे करण्यात येईल.

ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ही समस्या केवळ स्वच्छतेची नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बनली आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रकाश रामा गड्डलवार – मोबाईल: ८७८८४२९७४६ / ८२७५१२७९५७


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तुमचं गाव, तुमच्या बातम्या – वेळेत आणि विश्वासार्ह!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या