Advertisement

शेतकऱ्यांचा संताप! धान बोनस दोन महिने उलटूनही खात्यात नाही – महेश श्रीगिरीवार यांची शासनाकडे तात्काळ वितरणाची मागणी

 


📰 

शेतकऱ्यांचा संताप! धान बोनस दोन महिने उलटूनही खात्यात नाही – महेश श्रीगिरीवार यांची शासनाकडे तात्काळ वितरणाची मागणी


🗞️ 

पोंभुर्णा (जिल्हा चंद्रपूर): खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹२०,०००/- बोनस जाहीर करण्यात आला असतानाही, शासन निर्णय जाहीर होऊन दोन महिने उलटले तरी अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही.

या विलंबाविरोधात शिवसेना युवा सेना पोंभुर्णा शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांनी थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मा. सचिव यांना निवेदन सादर केले आहे. "शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम पुन्हा सुरू होत असताना, बी-बियाणे, खते, मशागत यासाठी शेतकरी कर्ज काढून तयारी करत आहेत. जाहीर केलेली रक्कम वेळेत मिळाली असती, तर मोठा दिलासा मिळाला असता," असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मा. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर आणि मा. सचिव श्रीमती सिंगल मॅडम यांच्या आश्वासनानंतर देखील हे वितरण रखडल्यामुळे ग्रामपातळीवर अफवा, गैरसमज आणि आर्थिक ताण वाढला आहे.

श्रीगिरीवार यांनी पुढील ठोस उपायांची मागणी केली आहे:

  1. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी
  2. वितरण प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करावेत
  3. स्थानिक प्रशासनामार्फत गती देऊन समन्वय साधावा
  4. गावपातळीवर स्पष्ट माहिती प्रसारित करावी

"हा बोनस केवळ योजना नसून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचा कणा आहे," असेही श्रीगिरीवार यांनी शेवटी नमूद केले.


🖼️ Daraara 24 Taas News Network 

🟠 धान बोनस अद्यापही मिळालेला नाही!
🔴 महेश श्रीगिरीवार यांची शासनाला तिव्र मागणी
⚠️ शेतकऱ्यांमध्ये संताप – खरीप हंगाम धोक्यात?
📰 वाचा सविस्तर बातमी - दरारा 24 तास

👉 [Mahesh Shrigiriwar | Shiv Sena | Bonus Delay | Farmer Protest | Kharip 2025]



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या