केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू, हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती बंद
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क |
केदारनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, यात्रेकरूंना घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर आज सकाळी सुमारे 5.20 वाजता गौरीकुंडजवळील जंगलात कोसळले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि काशी (वय २ वर्षे) यांचा समावेश आहे. केदारनाथ धामच्या दर्शनासाठी ही मंडळी हेलिकॉप्टरने प्रवास करत होती. दुर्दैवाने, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावले आणि ते दाट जंगलात कोसळले.
दुर्घटनेनंतर राहत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन पथकांनी मृतदेह काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, नागरी उड्डाण विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या दुर्घटनेनंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी सध्या यात्रा पुढे ढकलावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि अद्ययावत बातम्यांसाठी दरारा 24 तास न्युज नेटवर्कसोबत राहा.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading