📰 गडचिरोली विधानसभा प्रमुखपदी अविनाश पुच्छलवार यांची नियुक्ती – शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेत नवा उत्साह
गडचिरोली – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या गडचिरोली विधानसभा प्रमुखपदी अविनाश पुच्छलवार यांची आज (२९ जुलै) नियुक्ती करण्यात आली आहे.
शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद आणि सरचिटणीस प्रकाश ओहळे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रानुसार, नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. या कालावधीत पुच्छलवार हे महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिलांना आणि पुरुषांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.
संघटनेच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार पुच्छलवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनेची मजबुती वाढविण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले आहे.
संघटनेने दिलेल्या सूचनांनुसार, नियुक्त कार्यकाळात संघटन वाढविणे आणि विभागात शिव उद्योग संघटनेचे विविध उपक्रम सुरू करणे हे प्रमुख काम असेल. तसेच प्रत्येक महिन्याला केलेल्या कामाचा अहवाल संघटनेला सादर करणे आवश्यक असेल.
या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात शिव उद्योग संघटनेच्या कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख अंकुश मंडलवार, जिल्हा संपर्कप्रमुख मनोज गेडाम यांनी व्यक्त केली आहे.
✍️ Daraara 24 Tas
✍️ Vainganga News Live
🎥
0 टिप्पण्या
Thanks for reading