Advertisement

🔸शिवसेना प्रणित 'शिव उद्योग संघटनेच्या' गडचिरोली जिल्हा प्रमुखपदी अंकुश मंडलवार यांची नियुक्ती

दरारा 24 तास न्युज नेटवर्क




🔸शिवसेना प्रणित 'शिव उद्योग संघटनेच्या' गडचिरोली जिल्हा प्रमुखपदी अंकुश मंडलवार यांची नियुक्ती

✍️ प्रतिनिधी | वैनगंगा न्यूज लाईव्ह
📍गडचिरोली | दिनांक: १८ जुलै २०२५

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रणित 'शिव उद्योग संघटनेच्या' गडचिरोली जिल्हा प्रमुखपदी अंकुश मंडलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मूलचेरा या तालुक्यांकरिता एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

या नियुक्तीची अधिकृत घोषणा अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद (९८२०३१७१५०) व सरचिटणीस प्रकाश ओहळे (९७०२०५८९३०) यांनी केली आहे. मंडलवार यांच्याकडून जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांना व पुरुषांना लघुउद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे आणि संघटनेच्या उपक्रमांना गती देणे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संघटनेचा उद्देश तरुणांमध्ये स्वयंपूर्णता निर्माण करणे व ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे हा असून, अंकुश मंडलवार हे या दृष्टीने कार्यरत राहतील, असा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मंडलवार यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले, “ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची असून, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांची कार्यपद्धती यांचे अनुकरण करत मी संघटनेच्या विस्तारासाठी व युवकांच्या भविष्यासाठी कटिबद्ध राहीन.”

नियुक्तीनंतर प्रत्येक महिन्याला कार्य अहवाल देणे बंधनकारक असून, कार्यक्षेत्रात संघटना बळकट करणे व नवउद्योग प्रोत्साहन देणे यावर विशेष भर राहणार आहे.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या