✅
शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. गोकुळ लगड साहेब यांचा गडचिरोली दौरा भव्य स्वागतासह संपन्न
गडचिरोली :
शिवसेना शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. गोकुळ लगड साहेब यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन होताच त्यांचे जिल्हा प्रमुख मा. अंकुश भाऊ मंडलवार, जिल्हा संपर्क प्रमुख मनोज भाऊ गेडाम व अहेरी विधानसभा रोजगार समिती प्रमुख प्रकाश गद्दलवार यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यानंतर आलापल्ली येथील वनविभाग विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा घेण्यात आली.
यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास साहेबांनी भामरागड तालुक्याच्या दौऱ्याला प्रारंभ केला. सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी भामरागड येथील वनविभाग विश्रामगृह येथे आगमन झाले. येथे तालुका प्रमुख दिनेश भाऊ मडावी यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न, स्थानिक समस्या तसेच संघटनेच्या वाढीव कामकाजाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मा. गोकुळ लगड साहेबांनी भामरागड तालुक्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने व आश्वासनाने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते भारावून गेले. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भामरागड तालुक्यातील जनतेत संघटनेबद्दल विश्वास व जिव्हाळा निर्माण झाला असून स्थानिकांनी शिव उद्योग संघटनेशी जुळण्याची तयारी दर्शविली.
या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या महिला जिल्हा प्रमुखांचाही सक्रीय सहभाग लाभला. तसेच हेमलकसा येथे बाबाआमटे यांच्या स्मृतीस्थळालाही भेट देऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले.
मा. गोकुळ लगड साहेबांच्या या दौऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याला नवी गती मिळाली असून आगामी काळात जिल्ह्यात संघटना आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading