Advertisement

भव्य कबड्डी स्पर्धा : श्री साई क्रीडा मंडळ, जुनगांव तर्फे भव्य आयोजन

 

भव्य कबड्डी स्पर्धा : श्री साई क्रीडा मंडळ, जुनगांव तर्फे भव्य आयोजन

जुनगांव ( जि. चंद्रपूर)
श्री साई क्रीडा मंडळ, जुनगांव यांच्या वतीने गावामध्ये खेळाडूवृत्ती आणि सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी भव्य नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोहळा दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जुनगांव येथे पार पडणार आहे.

या प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला एक वेगळाच उत्साह लाभणार आहे.

🔸 उद्घाटक:
मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार

🔸 सहउद्घाटक:
मा. कु. अल्काताई आत्राम, मा. श्री. हरिभाऊ ढवस 

🔸 दिपप्रज्वलन:
मा. श्री. राहुलभाऊ पाल, मा. श्री. अंशुलभाऊ मोरे, मा. श्री. निलेशभाऊ मगनूरवार

🔸 विशेष उपस्थिती:
मा. श्री. रविभाऊ मरपल्लिवार, मा. श्री. विनोदभाऊ देशमुख, मा. श्री. रंजितभाऊ पिंपळशेंडे, मा. श्री. अजयभाऊ मस्के, मा. श्री. चंद्रशेखर व्याहारकर, मा. श्री. महेशभाऊ कडवलवारी, मा. श्री. भोजराज चुदरी, मा. श्री. नैलेशभाऊ चिंचोलकर

कार्यक्रमाचे आयोजन श्री साई क्रीडा मंडळ, जुनगांव यांच्या सौजन्याने करण्यात आले असून, दि. २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान ही कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये परिसरातील नामांकित संघ सहभागी होणार असून, ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आपली कला आणि कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.

संस्थेचे पदाधिकारी, खेळाडू व ग्रामस्थ सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

📍 स्थळ: जुनगांव
📅 दिनांक: २९ ते ३० ऑक्टोबर २०२५
📞 संपर्क: श्री साई क्रीडा मंडळ, जुनगांव — ७५०७६४०३३२

📰 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क करिता सविस्तर बातमी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या