⬇️
ग्रामीण फाउंडेशन इंडियाच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुका :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रामीण फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने स्थानिक जुनगाव जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आरोग्य तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाला ग्रामविकासाचे सक्षम नेतृत्व करणारे सरपंच राहुल भाऊ पाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याचा संदेश दिला.
ते म्हणाले की, “बालकांचे आरोग्य चांगले असेल तरच त्यांची शैक्षणिक व वैयक्तिक प्रगती वेगाने घडते.”
शिबिरात विद्यार्थ्यांची
- उंची, वजन मोजमाप
- दृष्टी तपासणी
- रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी
- दंत व सामान्य आरोग्य तपासणी
अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
या आरोग्य उपक्रमाचे संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. आशाताई मधुकर झाडे यांनी विशेष नियोजन केले.
समाजाप्रती त्यांची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,
“समाजाच्या चांगल्या हितासाठी व समाज प्रगती करावा यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम सतत प्रयत्न करत आहे आणि पुढेही हे कार्य अखंडपणे सुरूच राहील.” — सौ. आशाताई झाडे
त्यांच्या सोबत शीलाताई झबाळे, संगिता ताई झबाडे,बॉबी झाडे, शिक्षक वर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिक व पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
ग्रामीण फाउंडेशन इंडियाच्या या आरोग्य जागरूकता मोहीमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य संवर्धनाची महत्वाची जाणीव निर्माण झाली असून हा प्रशंसनीय उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.









0 टिप्पण्या
Thanks for reading