Advertisement

जूनगाव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी





जूनगाव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

जूनगाव : आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थानी असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जूनगाव येथे सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल रामचंद्र भोयर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या व उज्वल ग्राम संघाच्या सर्वेसर्वा सौ आशाताई मधुकर झाडे, उज्वल ग्राम संघाच्या सचिव शीलाताई झबाडे, जमानादास खोब्रागडे, आनंदराव रंगारी, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी चालवलेल्या संघर्षाची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

यानंतर महिला व युवकांनी सादर केलेल्या गोंडी सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांचे विशेष मन मोहून घेतले. पारंपरिक वेशभूषा, डोल-ढोलाच्या तालावर सादर झालेल्या नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

या जयंती कार्यक्रमास ग्रामस्थांचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकोपा, संस्कृती आणि परंपरा जपण्याची ही संधी असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या