Advertisement

समाजसेवक आशा ताई झाडे यांच्या पुढाकाराला यश जुनगावमध्ये ५ वर्षांपासून बंद असलेला नळ सुरु

 



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी

समाजसेवक आशा ताई झाडे यांच्या पुढाकाराला यश
जुनगावमध्ये ५ वर्षांपासून बंद असलेला नळ सुरु

पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे गेल्या तब्बल पाच वर्षांपासून बंद असलेल्या पाणीपुरवठ्याच्या नळाला अखेर पुन्हा जीवनदान मिळाले आहे. समाजसेवक आशा ताई झाडे यांनी पुढाकार घेत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून ग्रामस्थांचा दीर्घकाळचा प्रश्न संपुष्टात आणला.


गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही कोणत्याही पातळीवर तोडगा निघत नव्हता. महिलांना व वृद्धांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या समस्येची गंभीरता ओळखून समाजसेवक आशा ताई झाडे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला तसेच ग्रामपंचायत व पाणीपुरवठा यंत्रणेवर सातत्याने पाठपुरावा केला.


त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि आज पाच वर्षांनंतर बंद पडलेल्या नळातून पाणी वाहू लागले. नळ पुन्हा सुरु होताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. महिलांनी आनंदाने जलभिसेक करून आशा ताईंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

गावकऱ्यांनी सांगितले की —
“आशा ताई नसत्या तर कदाचित अजूनही आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागला असता. त्यांच्या कार्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.”

यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने शीलाताई झबाडे, संगीता ताई झबाडे, सईबाई भोयर,...सौ. भोयर, सौ.गेडेकर, सौ. झबाडेव इतर महिला उपस्थित होत्या.
समाजासाठी नेहमी तत्पर राहून सेवा देणाऱ्या आशा ताई झाडे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


🌐 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📢 आपल्या हक्काच्या बातम्या आवाज देत राहील
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा 🙏


 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या