जूनगाव येथे ‘बाजारी विकलेली नार (अर्थात भाड्याची बायको)’ नाटकाचे माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
जूनगाव, ता. पोंभूर्णा (जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
जूनगाव येथे सामाजिक आशय असलेल्या ‘बाजारी विकलेली नार ( अर्थात भाड्याची बायको)’ या लोकप्रिय नाटकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. शिवशक्ती नाट्यकला मंडळ यांच्या वतीने आयोजित या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती, भाजपा महिला प्रदेश महामंत्री अलकाताई आत्राम उपस्थित होत्या.
नाट्यप्रयोगाच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी आठ वाजता डान्स हंगामा कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच व भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पत्रकार जीवनदास गेडाम, दौलत उर्फ प्रफुल चुधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी भाऊ मरपल्लीवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय मस्के, पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भाऊ चुधरी, जूनगावचे माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम, वैभव लक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक निलेश भाऊ मगनुरवार, भोसरीचे उपसरपंच जितेंद्र चुधरी, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत उर्फ प्रफुल चुधरी, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील पाल, ओम देव पाल, बिल्डिंग मटेरियल सप्लायर संदीप भाऊ आगळे, फुटण्याचे उपसरपंच नैलेश भाऊ चिंचोलकर, श्याम भाऊ अलगमवार, खुशाल भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१६ डिसेंबर रोजी रात्री आयोजित या नाट्यप्रयोगाला महिला व पुरुष प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती लाभली. सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट अभिनय, प्रभावी संवाद आणि आशयपूर्ण मांडणीमुळे प्रेक्षकांनी कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
शिवशक्ती नाट्यकला मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत अशा सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततापूर्ण व यशस्वी वातावरणात पार पडला.







0 टिप्पण्या
Thanks for reading