Advertisement

🌹 फुले–शाहू–आंबेडकर–मान्यवर कांशीराम चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता गणपतजी तावाडे यांचे अपघाती निधन 🌹

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇


🌹 फुले–शाहू–आंबेडकर–मान्यवर कांशीराम चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता गणपतजी तावाडे यांचे अपघाती निधन 🌹


(मनोज गेडाम)

आलापल्ली | प्रतिनिधी

फुले–शाहू–आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेवर आयुष्यभर निष्ठेने कार्य करणारे बहुजन चळवळीतील हाडामासाचे कार्यकर्ते बुद्धवासी गणपतजी तावाडे (रा. रेंगुंठा, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली) यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीवर शोककळा पसरली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून गणपतजी तावाडे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. आर्थिकदृष्ट्या मर्यादा असतानाही त्यांनी फुले–शाहू–आंबेडकर–कांशीराम यांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार प्रामाणिकपणे केला. विचारांनी परिपक्व, संघर्षशील व निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. ते सध्या आपल्या कुटुंबासह आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथे वास्तव्यास होते.

🔴 अपघाताची घटना
दिनांक 09 डिसेंबर 2025, दुपारी सुमारे 3:15 वाजता, आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौक परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना, मागून येणाऱ्या मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने गणपतजी तावाडे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर कुटुंबीय व विविध सामाजिक संघटनांच्या आर्थिक सहकार्याने त्यांना चंद्रपूर येथील मेहरा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर्वतोपरी उपचार सुरू असतानाही काल सकाळी 5:25 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

चळवळीची मोठी हानी
बहुजन संत–गुरु–महापुरुषांच्या चळवळीतील एक सच्चा शिपाई हरपल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा विचारनिष्ठ, प्रामाणिक व संघर्षशील कार्यकर्त्यांची उभारणी करणे अत्यंत कठीण असते, अशी भावना विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

🚥 अंत्यविधी
स्व. गणपतजी तावाडे यांचा अंतिम संस्कार आज सायंकाळी 5:00 वाजता आलापल्ली येथे करण्यात आले.

🕊️ श्रद्धांजली
“माणसाला एक ना एक दिवस मरणे अटळ आहे, मात्र महापुरुषांच्या चळवळीत कार्य करत असताना आलेले असे मरण गौरवास्पद असते,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

🙏 बामसेफ गडचिरोली / अहेरी युनिट तर्फे स्व. गणपतजी तावाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व शतशः नमन 🙏
🌹🌹🌹



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या