दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभुर्णा तालुका
रेतीघाट खंडणी प्रकरणात काँग्रेसचे वैभव पिंपळशेंडे अटकेत
रामनगर पोलिसांची कारवाई — तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ
पोंभुर्णा : चेक वेऴवा–अंधेरी नदी घाटावरील रेती उत्खननाच्या कामात अडथळे निर्माण करून कंत्राटदाराकडून खंडणी उकळल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे स्थानिक नेता वैभव कुशाबराव पिंपळशेंडे (वय 30, रा. कवठी, ता. पोंभुर्णा) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 308(5) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई रेती घाटाचे कंत्राटदार शिवकुमार शंकर कोरवार (वय 40, रा. रामनगर) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून करण्यात आली आहे.
फिर्यादीतील आरोप
कंत्राटदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा रेतीघाटाचा दोन वर्षांचा लिलाव ठेका घेतलेला असून, काम सुरु असताना आरोपी पिंपळशेंडे यांनी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून उत्खनन थांबविण्याचा प्रयत्न केला.
“काम होऊ देणार नाही, घाट बंद पाडतो, जिवंत सोडणार नाही” अशा तोंडी धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
खंडणीबाबत :
- ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना ₹1,43,000 स्वीकारले
- सुपरवायझरकडून ₹1,00,000 रोख स्वरूपात उकळले
- अशा प्रकारे एकूण ₹2,43,000 रक्कम घेण्यात आल्याचा दावा
पोलीस तपास
तक्रार प्राप्त होताच रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
घटनेची सत्यता आणि पैशांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित पुरावे जमा केले जात आहेत.
राजकीय खळबळ
स्थानिक काँग्रेस वर्तुळात या घटनेने भूकंप झाला असून तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. पुढील तपासाच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी




0 टिप्पण्या
Thanks for reading