दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी | पोंभुर्णा
समाजसेवेतून गावाचा विकास – आशाताई झाडें यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांचा सलाम

समाजसेवेच्या प्रामाणिक भावनेतून प्रेरित होत, गेल्या पाच वर्षांपासून ‘उमेद’ या माध्यमातून आशाताई झाडे सतत विविध उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य पुढे नेत आहेत. आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांची एकजूट वाढवणे, महिला सक्षमीकरणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच गावातील मूलभूत समस्यांवर सक्रियपणे लढा देणे, या सर्व क्षेत्रांत त्यांचे अविरत योगदान मोलाचे आहे.
गावातील हातपंपाची बिघाड समस्या असो किंवा पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेची समस्या—अशा प्रत्येक वेळी आशाताई झाडे पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करत त्या समस्या सोडवण्याचे काम करतात. त्यांच्या या कार्याची दखल सर्व स्तरातून घेण्यात आली असून अनेक नागरिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आशाताईंना या समाजकार्यासाठी त्यांच्या महिला संघटनेचे मजबूत पाठबळ लाभले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शीलाताई झबाडे, संगीता ताई झबाडे आणि अनेक कार्यकर्त्या महिला दिवस-रात्र साथ देत आहेत. महिला स्वावलंबनाची ज्योत सर्वांच्या मनात प्रज्वलित होण्यासाठी या टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
समाजासाठी न थकता काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या प्रेरणादायी सेवेमुळे गावात विकासाची नवी उर्जा आणि सकारात्मकता निर्माण होत आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
आपला आवाज – आपली बातमी
🙏









0 टिप्पण्या
Thanks for reading