लढवय्या पत्रकार अमित राऊत यांचे दुर्दैवी निधन
मुल तालुका प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुल : स्थानिक पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत लढवय्या, निर्भिड आणि निर्भय आवाज म्हणून ओळखले जाणारे पत्रकार अमित राऊत यांचे निधन झाल्याची अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतृत्व आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पत्रकार अमित राऊत यांनी सदैव अन्याय, भ्रष्टाचार, सामाजिक विसंगती आणि जनतेच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवला. अनेकवेळा दबाव, धमक्या आणि अडथळे येऊनही त्यांनी पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांशी तडजोड केली नाही. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आधारित त्यांची लेखणी आणि वाणी नेहमीच प्रभावी ठरली.
स्थानिक समस्यांवर त्यांच्या बातम्या आणि रिपोर्टमुळे अनेक वेळा प्रशासनालाही निर्णय घ्यावे लागले. समाजहितासाठी काम करणारा, सत्यासाठी लढणारा आणि जनतेचा आवाज बनलेला एक प्रामाणिक पत्रकार आज आपल्यातून निघून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे आई-वडील, व बराच मोठा आप्त असा परिवार असा परिवार आहे.
पत्रकार संघटना, सामाजिक संस्था व नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल खोल शोक व्यक्त केला असून "पत्रकारितेतील एक खंबीर योद्धा आपण गमावला" अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
ईश्वर त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
ओंमशांती.
🙏




0 टिप्पण्या
Thanks for reading